पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तो आणि ती

इमेज
तो स्वतःला  दाखवतो कणखर , मनात मात्र कल्लोळ भावनांचा नेहमीच ती शांत ,मुळमुळीत वाटते ,असते मात्र खंबीर ! किती सहज दिसतो ना, फरक दोघांमधला 'वरवर' पण समानता मात्र दुर्मिळच ,आपल्याच नजरेतली! आयुष्य म्हणजे आहे तरी काय हो? स्वतःची ओळख शोधणं, की हरवलेलं माणुसपण पुन्हा  जगणं ? इथे तीही असते झगडत ,तोही असतो लढत , दोघेही अजमावतात नवीन आव्हानांवर आपल्या क्षमता , पण मनाला मात्र पटत नाहीत कमतरता ! चांगल सोडून नेहमी ,कमी का पाहावं ? का मनाने सतत भेदभावाच्या वाटेला जावं ? काळानुसार  दोघांसाठीही आयुष्य बदलत सर्वच बाबतीत ........ तरीही काही गोष्टी राहून गेल्याची जाणीव जागी होते , सर्व काही सारखं,मग फरक आहे तरी कुठे? मनात की माणसांत ?की माणसांच्या मनांत? कधी ती सोशिक ,सालस ,कमजोर.... तर कधी तो मजबूत ,रांगडा ,कणखर! कधी ती उत्तम तर कधी तोच कमी , कधी ही त्याची कामं तर कधी ही तिचीच कामं! कुठून बर अली ही भयंकर तुलना , सांगशील का रे माझ्या मना? फरक कळतो ह्या डोळ्यांना फक्त शरीराचा , मग समानता का कळत नसावी ह्या मनाला 'स्व'त्वाची? वर्षानुवर्षे गेली जात आहेत , प...