तो आणि ती
तो स्वतःला दाखवतो कणखर ,
मनात मात्र कल्लोळ भावनांचा नेहमीच
ती शांत ,मुळमुळीत वाटते ,असते मात्र खंबीर !
किती सहज दिसतो ना, फरक दोघांमधला 'वरवर'
पण समानता मात्र दुर्मिळच ,आपल्याच नजरेतली!
आयुष्य म्हणजे आहे तरी काय हो?
स्वतःची ओळख शोधणं, की हरवलेलं माणुसपण पुन्हा जगणं ?
इथे तीही असते झगडत ,तोही असतो लढत ,
दोघेही अजमावतात नवीन आव्हानांवर आपल्या क्षमता ,
पण मनाला मात्र पटत नाहीत कमतरता !
चांगल सोडून नेहमी ,कमी का पाहावं ?
का मनाने सतत भेदभावाच्या वाटेला जावं ?
काळानुसार दोघांसाठीही आयुष्य बदलत सर्वच बाबतीत ........
तरीही काही गोष्टी राहून गेल्याची जाणीव जागी होते ,
सर्व काही सारखं,मग फरक आहे तरी कुठे?
मनात की माणसांत ?की माणसांच्या मनांत?
कधी ती सोशिक ,सालस ,कमजोर....
तर कधी तो मजबूत ,रांगडा ,कणखर!
कधी ती उत्तम तर कधी तोच कमी ,
कधी ही त्याची कामं तर कधी ही तिचीच कामं!
कुठून बर अली ही भयंकर तुलना ,
सांगशील का रे माझ्या मना?
फरक कळतो ह्या डोळ्यांना फक्त शरीराचा ,
मग समानता का कळत नसावी ह्या मनाला 'स्व'त्वाची?
वर्षानुवर्षे गेली जात आहेत ,
पण आपण 'पुरूष' आणि 'स्त्री' ह्या चौकटीतल्या विचारांमधले तथाकथित भेद आजही जगत आहोत!
आहेत काही निर्मळ मनं ,आदर्शाने भारलेली ,समानता असलेली!
पण त्यांच्यावरही दिसतेय मात केलेली ,
कधी परंपरागत ,तर कधी फक्त 'स्त्रीवादी' किंवा 'पुरुषवादी' कर्मठ विचारांनी !
किती विचित्र आहोत ना आपण ?
आपलाच आपल्याशी वाद चाललाय,
एकदा तरी विचारावं मनाला ,तू कोण आहेस?
शरीराने स्त्री असून मनाने पुरुष,की शरीराने पुरुष असून मनाने स्त्री ?
ओरडून सांगावस वाटतं की,
प्रत्येकाला लहानपणासून 'स्त्री-पुरूष समानतेने' जगायला शिकवा ,
आणि फक्त'स्त्री' किंवा 'पुरुष' म्हणून नाही तर माणूस म्हणून घडवा!
पण प्रत्येकाची मतच वेगळी ,
जे दिसतं ते मानणारी ,
डोळे असूनही आंधळं वागणारी ,अन जे आहे ते राहू देणारी!
तरीही कळत नाही अजून ,
'स्त्री-पुरुष'समान आयुष्याच महत्व सांगू तरी कसं ?
कारण माझ्याच मनावर विचारांचा पगडा आहे असा ,
की तो मोडू तरी कसा ?
आत्ता ,मात्र ठरवलय ,सकारात्मकतेन अन हिमतीनं मोडायच्या आपल्याच संकुचित समजुती ,
अस्तित्वाच्याच लढाईसाठी ............
नाही मागे हटणार हे 'स्त्री-पुरुष'समान मन',
आत्ता कुणाच्याही भीतीपोटी !

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा