तुलनेपलीकडे.........😊💛💚
तुलनेच्या पलीकडे. ......😊 तुलनेच्या पलीकडचं जगच वेगळं असतं...... इथे कोणीच लहान नसतं ..कोणी मोठ्ठंही नसतं.... सर्व असतात सारखेच इथे.... प्रत्येकजण वेगळा असतो हे आपण म्हणतो खरं..... पण ही विचित्र तुलना सोडता येईल का सहज सांगा बरं....? तो तसा ....ती तशी...हे तर नेहमीचंच आहे.... हल्ली तुलना करायला विषयच खुप आहेत... कोणी म्हणतं ..तुलना वाईट असते दोन गोष्टींतली.. कारण काय तर ......आपण स्वतःला न ओळखता... इतरांशी बरोबरी करू पाहत असतो. ..जे अशक्य आहे..... का जबरदस्ती असा प्रयत्न करायचा ..कळत नाही .... मग त्रासही स्वतःला करून घ्यायचा. ... तुलना करणं कधीकधी असमाधानी असल्याचं लक्षण वाटतं...... कोणी म्हणतं तुलना पूर्णतः वाईट नाही....खरय ते.. कारण एखाद्या तुलनेतून तुम्ही जर काही मनापासून शिकत असाल तर ती तुलना नाहीच ....ते तुलनेच्या पलीकडचं जग आहे.... फक्त तुलना करावी पण चांगल्या हेतूने तरच तुम्ही स्वतःला घडवू शकाल... नाही तर नेहमीच आपण माणसं एकमेकांची लायकी तुलना करूनच दाखवू पाहतो... मग अशी माणसं ...एखाद्याचे चांगले गुण ...कसे समजून घेणार...? कसं काय ..आपण ह्या तुलनेच...